. त्यामुळे आता 2026 मध्ये सोन्या-चांदीचे भाव नेमके कुठपर्यंत जाऊ शकतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCX) वर गेल्या वर्षभरात सोन्याच्या किमतीत सुमारे 78 टक्क्यांची वाढ झाली आहे. डिसेंबर 2024 मध्ये 10 ग्रॅम सोन्याचा भाव सुमारे 75 हजार रुपयांच्या आसपास होता, तोच डिसेंबर 2025 अखेरीस थेट 1 लाख 33 हजार रुपयांपर्यंत पोहोचला. यामुळे सोनं पुन्हा एकदा सुरक्षित गुंतवणुकीचा मजबूत पर्याय ठरल्याचं चित्र आहे.
चांदीने तर सोन्यालाही मागे टाकत जबरदस्त तेजी दाखवली आहे. वर्षभरात चांदीच्या किमतीत सुमारे 144 टक्क्यांची वाढ झाली आहे. डिसेंबर 2024 मध्ये सुमारे 85 हजार रुपये किलो असलेला चांदीचा भाव डिसेंबर 2025 मध्ये तब्बल 2 लाख 8 हजार रुपये किलोपर्यंत गेला आहे.
तज्ज्ञांच्या मते जागतिक आर्थिक अनिश्चितता, भू-राजकीय तणाव, डॉलरमधील चढ-उतार आणि मध्यवर्ती बँकांची धोरणे यामुळे 2026 मध्येही सोनं-चांदीच्या किमतींना पाठबळ मिळू शकतं. त्यामुळे नवीन वर्षातही या मौल्यवान धातूंमध्ये तेजी कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकूणच 2026 हे साल सोनं आणि चांदीसाठी ‘रॉकेट’ ठरणार का, याबाबत बाजारात सकारात्मक वातावरण असून गुंतवणूकदार मात्र प्रत्येक घडामोडीकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
